
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
लोहा शहरात दि.१४ फेब्रुवारी रोज मंगळवार आठवडी बाजाराच्या दिवशी पोलिस स्टेशन समोर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका शाखा लोहाच्या वतीने शिवसेना लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी लोहा पोलिस स्टेशन समोर मेनरोड येथे सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरिब वयोवृद्ध नागरिकांना डोळ्याची मोफत तपासणी , चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते.
या मोफत डोळ्याच्या तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर होते.
प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्कर पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, कार्यक्रमाचे आयोजक तथा शिवसेना लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. राज्याच्या विकासासाठी आपणाला १७-१७ तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहेत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर म्हणाले.
यावेळी शिवसेना शहर संघटक संदिप पवार,शहर समन्वय संतोष शेंडगे, तालुका संघटक प्रभाकर राऊत, उपशहरप्रमुख माधव राठोड, सुनील रेठेवार, मकरंद पाटील पवार यांच्या सहित मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
तसेच यावेळी लोहा शहर व ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घेतला व यावेळी ४०० रुग्णांनी डोळ्याची तपासणी केली तर १७० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
सदरील शिबिरात रुग्णांच्या डोळ्याची तपासणी तज्ञ डाॅ. अमृता ऋषीकेश माहेश्वर व त्यांच्या टीमने तपासणी केली.
तसेच सदरील कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील वैजेनाथ पांचाळ यांनी केले तर आभार शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी मानले.