
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी पोलीस चौकी येथे कार्यरत असलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गोंधळ घालणाऱ्या महिलेकडून मारहाण केली. लीस महिलेचे कपडे फाडण्याचा धक्कादायक प्रकार रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुम रास घडला. याप्रकरणी राणी वडजे नावाच्या महिलेविरुद्ध रामतीर्थ पो लीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
बिलोली तालुक्यातील रामतीर्थपोलीस ठाण्याच्या महिला पो पोलीस सुप्रिया दत्तात्रय मगर आणि त्यांच्या सहकारी महिला कर्मचारी श्रीमती स्वामी ह्या दोघी नरसी चौकी येथे आपले कर्तव्य बजावत होत्या. यावेळी याच भागात राहण री राणी त्र्यंबक वडजे (वय ३५) या महिलेने रस्त्यावर येऊन गोंधळ घालून वाहतुकीस अडथळा निर्माणकेला. यावेळी कर्तव्यावर असलेल्यासुप्रिया मगर आणि सहकारी स्वामी यांनी सदर महिलेस समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु ती काही एक ऐकण्यास तयार नव्हती. उलट महिला पोलिसांना तिने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. एवढ्यावरच न थांबता सुप्रिया मगर यांचे कपडे फाडून मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सुप्रिया मगर यांच्या फिर्यादीवरून गोंधळ घालणाऱ्या राणी त्र्यंबक वडजे हिच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी व अन्य कलमान्वये रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करत आहे.