
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
“जन्मभूमी रोहा असली तरी कर्मभूमी श्रीवर्धन मतदार संघ”
म्हसळा – श्रीवर्धन मतदार संघाच्या जनतेने मला आमदार केले म्हणुन मी सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधी पुरस्कारास पात्र झाले आहे.मतदार संघातील जनतेने माझ्यासह खासदार सुनिल तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर आशीर्वादरुपी भरभरून प्रेम केले आहे.माझी जन्मभुमी जरी रोहा असली तरी खऱ्या अर्थाने कर्मभुमी श्रीवर्धन मतदार संघ असल्याचे प्रतिपादन आमदार आदिती तटकरे यांनी म्हसळा येथे भव्य आयोजित सोहळा हळदी कुंकवाचा,स्त्रीच्या सौभाग्याचा आणि सन्मानाचा कार्यक्रमांत व्यक्त केले.राजकारण आणि पुरस्कारापलीकडे येथील जनतेजवळ आपले आपुलकीचे नात जुळले आहे असे सांगताना राजकारणाचे पुरस्कारापेक्षा मला जास्त अभिमान श्रीवर्धन मतदार संघाची आमदार असल्याचा आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ.ए.आर.अंतुले,माजी मंत्री रविंद्र राऊत यांनी ज्या मतदार संघाचे नेतृत्व केले त्या मतदार संघात सन २००९ मध्ये प्रथम खासदार सुनिल तटकरे यांना आणि सन २०१९ मध्ये मला आमदार होता आले ते ऋण कधीच फेडता येणार नाही असे सूचक वक्तव्य आमदार आदिती तटकरे यांनी करताना यंदाच्या वर्षी खास महिलांसाठी हळदीकुंकू समारंभातून सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला म्हसळयात मिळालेला प्रतिसाद खुप आनंदायी आहे.कोरोना काळ वगळता दरवर्षी पैठणीसाडी, पाककला,मंगळागौर,भजन संगीत आदी कार्यक्रमाचे आयोजन करून महिलाना खुल व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही आमदार आदिती तटकरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित सोहळा स्नेहबंधाचा भव्य हळदी कुंकू समारंभ म्हसळा येथे कन्या शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.सन्मान स्त्रीच्या सौभाग्याचा, हळदी कुंकवाच्या सोहळ्यात म्हसळयातील हजारो माताभगिनींनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा गीतातुन अनेकजणांनी नृत्य सादर केले आणि सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम लकी ड्रॉचे माध्यमातून आकर्षक बक्षीस प्राप्त केले.आमदार आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांचे मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँगेस महीला कार्यकारणी अध्यक्षा सोनल घोले,जिल्हा चिटणीस रेश्मा काणसे,युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,माजी जीप सदस्या वैशाली सावंत,माजी सभापती छाया म्हात्रे,माजी सभापती उज्वला सावंत,सरपंच वनिता खोत,कणघर सरपंच श्रीमती सावंत,नगरसेविका सरोज म्हशिलकर, सभापती सुमैया आमदानी,नगरसेविका राखी सावंत,अर्चना बनकर आदी पदाधिकारी यांनी भाग घेतला होता.हळीकुंकवाला उपस्थित हजारो महिलांना सौभाग्य तिलक लावुन वान म्हणुन खाऊ व भेटवस्तु देण्यात आले.कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानीक व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.