
दैनिक चालू वार्ता आष्टी ता.प्रतिनिधी- अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): नजीकच्या पोरगव्हान (पंचाळा) येथे सायंकाळच्या सुमारास गावातील गोठ्यात शिरून वासराला जखमी केले त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत असे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख चंद्रशेखर शालिकराम नेहारे (५०) यांच्या मालकीच्या गावातील गोठ्यात लहान वासरू खेळत होते दरम्यान नजीकच्या जंगलातून बिबट वाघ गोठ्यात येऊन वासराला जखमी करून फस्त करण्याच्या प्रयत्नांत वाघ असताना उशिरापर्यंत थांबलेल्या मद्यपींना वाघाच्या हालचाली दिसताच त्यांनी जोरांनी आवाज केला असता बिबट वाघ जखमी वासराला जागेवर टाकून पळून गेला आणि वासराचा प्राण वाचला सदर वासराची किंमत बाजारभावाने १० हजार रुपयांच्या वर असल्याचा दावा शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रशेखर नेहारे यांनी केला आहे त्यासाठी बिबट वाघाचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित वनविभागाच्या कार्यालयात केली आहे