
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (धामणगाव रेल्वे) :- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात एका ५० वर्षीय व्यक्तीने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिचे लैंगिक शोषण केले आणि त्या मुलीला बदनामी करण्याची धमकी दिली.ही धक्कादायक घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलीसांनी त्या नराधमाला अटक केली आहे.
घनश्याम वय ५० रा.सावळा असे त्या आरोपींचे नाव आहे.घनश्याम पीडित १६ वर्षीय मुलीच्या परिचयातीलच आहे.या परिचयातूनच त्याने पीडित मुली सोबत जवळीक साधून तिचे लैंगिक शोषण केले.आरोपीने शाळेपर्यंत मुलीचा पाठलाग करून त्याने त्या मुलीला या प्रकाराबद्दल बदनामी करण्याची धमकी दिली.त्यानंतर एक दिवस थेट त्या व्यक्तीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला.त्याने तिच्यासह मुलीच्या आई-वडिलांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेल्या प्रकाराची दत्तापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने तक्रार दाखल केली असून पोलीसांनी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी घनश्यामविरुद्ध बलात्कार,विनयभंग,जीवे मारण्याची धमकी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ३७६ (२) n३५४,३५४ (a) (d) ,५०६ भांदवी सहकलम ४,६,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करून त्या नराधमाला दत्तापुर पोलीसांनी अटक केली आहे.