
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा शहरामध्ये रोडरोमिओनी उच्छाद मांडला असून मुलीच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोडरोमिओचा बंदोबस्त करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मंठा शहर व परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून रोडरोमिओ शालेय विद्यार्थिनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मंठा शहरातील शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरामध्ये व काही ठराविक ठिकाणी व पान ठेवल्यावर तसेच रस्त्यावर उभे राहून अश्लील हावभाव करणे, धूम स्टाईलने दुचाकी चालवत मुलींना कट मारणे, मुलीचा पाठलाग करणे, दुचाकी वाहनाच्या सायलेन्सर मध्ये बदल करून विचित्र आवाज काढणे असे प्रकार नित्याचेच होऊन बसले आहेत. यासह शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये दुचाकीवर रोडरोमिओ डबल सीट, ट्रिपल सीट, दुचाकी वेगाने चालवत वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करत, शाळा महाविद्यालयीन मुला मुलींना त्रास देतात. बस स्थानक व महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या आवाजामध्ये दुचाकीचे हॉर्न
वाजवत मुलींचा पाठलाग करत मुलींची छेड
काढतात. मंठा बस स्थानकावर शालेय मुलींना
शाळा सुटण्याच्या वेळेला बसमध्ये चढता उतरताना वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करणे शिट्ट्या मारणे, गर्दीचा फायदा घेऊन धक्का देणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंठा शहरासह परिसरामध्ये रोड रोमिओ चा उच्छाद वाढला असल्यामुळे शालेय मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने मंठा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेड मंठा तालुका अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे, शहराध्यक्ष रामराज खराबे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संतोष वाघमारे, शहर सचिव आसाराम झोल, खोराडसावंगी सर्कल प्रमुख गोविंद मानुरकर, प्रसिध्दी प्रमुख रमेश वाघमारे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.