दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी-समीर मुल्ला
आजच्या पिढीला छत्रपती शिवरायांचे विचार आधुनिक पद्धतीने समजावून सांगण्याचे आवश्यक असल्याचे मत प्रा विशाल गरड यांनी शिवसेवा तालीम संघ आयोजित व्याख्यानमालेत सोमवारी व्यक्त केले.
शिवसेवा तालीम संघाचे प्रमुख शिवाजी कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात होळकर चौक येथे दिनांक अकरा पासून शिवजनमोतसवानिमित व्याख्यानमाला सुरू आहे.
सोमवारी या व्याख्यानमालेचे उद्घाटन तालीम संघाचे प्रमुख शिवाजी कापसे, राजाभाऊ मुंडे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय मुंदडा, पांडुरंग कुंभार, माजी आमदार दयानंद गायकवाड, दिलीपराव देशमुख, मुश्ताक कुरेशी, शंकरराव करंजकर, दत्तात्रय वाघ, नागनाथ घुले, सुनील गायकवाड, श्याम नाना खबाले, प्रदिप मेटे, बाबुशेठ बागरेचा, सुधीर भवर, तारेक मिर्झा, दिलीप पाटील, मुसदेक काझी, सतपाल बनसोडे, किशोर वाघमारे, शंकरराव वाघमारे, सलीम शेख, अतिक पठाण, शिकलकर शहाजन, संभाजी साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा गरड हे शिवराय समजून घेताना या विषयावर बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की सध्याच्या काळात ढाल तलवारीच्या लढाया संपलेल्या असुन आता तुम्हाला सत्ता स्थानी यायचे असेल किंवा सुखकर जिवन जगायचे असेल तर तरूणांनी निट, जेई अशा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी मुलांच्या वाढदिवसानिमित्त विविध खेळणी भेट देण्याऐवजी पुस्तके भेट दयावित.
छत्रपती शिवराय यांनी स्वराज्य निर्माण केले आपण आजच्या काळात आपल्या पायावर उभे रहाणे आवश्यक आहे. या साठी वाचन आवश्यक आहे वाचनानेच माणूस सर्वश्रेष्ठ ठरतो. छत्रपती शिवराय व त्यांचे कार्य आणि आजच्या युवकांनी व पालकांनी करावयाचे कार्य याचा ताळमेळ घालत व संदर्भ देत त्यांनी छत्रपती शिवराय समजुन घेताना हा विषय श्रोत्यांच्या गळी उतरविला.
यावेळी शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले छत्रपती शिवराय यांच्यावरील विचार व्याख्यानाचे अगोदर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर पालकर, जगदीश गवळी, महादेव गपाट यांनी केले तर आभार नामदेव पौळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजनमोतसव समितीचे अध्यक्ष अतुल कवडे, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, गोविंद चौधरी, सचिव रोहन पारख व शिवसेवा तालीम संघाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
