
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी गोर बंजारा समाज म्हसळा आणि बंजारा समाज कर्मचारी म्हसळा यांच्या सौजन्याने श्रीसंत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.गोर बंजारा समाज मंडळ म्हसळा कार्यालय ते पाच गाव आगरी समाज हॉल येथपर्यंत उत्साहात वाजत गाजत रॅली काढण्यात आली.बंजारा महिला आपल्या पारंपरिक पोशाख घालून आल्या होत्या.
सेवालाल महाराज यांचा महाभोग आणि कार्यक्रम म्हसळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री. सोनवणे साहेब,बंजारा समाज मंडळ अध्यक्ष श्री.धेनु चव्हाण ,बंजारा समाज कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष श्री.शिवराम आडे ,श्री.रमेश जाधव ,श्री.महादेव पवार ,श्री. काळूराम राठोड आणि श्री.भानुदास राठोड यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
श्री.संत सेवालाल महाराज मानवतावादी,आयुर्वेदाचार्य, क्रांतिकारक,व्यापारी, अर्थतज्ज्ञ,निसर्ग पूजक आणि दूरदृष्टी असणारे संत होते.त्यांनी कोर- गोर म्हणजे सर्व समाजासाठी समाज जागृती आणि कल्याणाचे कार्य केले. यावेळी गोर बंजारा समाज म्हसळा यांच्याकडून पहिला गोररत्न पुरस्कार प्राथमिक शिक्षक आणि सन 2023 चा गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री.रमेश जाधव शाळा निगडी,तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री.भानुदास राठोड शाळा रोहिणी यांना पोलीस निरीक्षक श्री.सोनवणे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला देण्यात आला.तसेच म्हसळा येथील शिक्षक आणि कर्मचारी विस्तार अधिकारी शिक्षण श्री शिवराम आडे साहेब श्री. काळूराम राठोड, श्री महादेव पवार,श्री.बालाजी राठोड,श्री.साहेब चव्हाण,श्री. नरेश पवार ,श्री. पूनमचंद जाधव यांचा सामाजिक कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास श्री.चरण चव्हाण वनरक्षक म्हसळा,श्री.प्रकाश राठोड तळा हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.धेनु चव्हाण अध्यक्ष,श्री.शंकर चव्हाण उपाध्यक्ष,श्री.प्रवीण चव्हाण सचिव,श्री.देवेंद्र पवार खजिनदार ,श्री.प्रभू चव्हाण ,श्री. विश्वनाथ पवार, श्री.रमेश चव्हाण,श्री.प्रकाश चव्हाण,अनिल पवार आणि समस्त युवा तरुण गोर बंजारा सदस्य,महिला प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सेवालाल पवार यांनी केले.