
चिंचोली राहीमापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : महिलेसह तीन व्यक्तींनी एका ३२ वर्षीय युवकाला मारहाण केल्याची घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३० जून २०२३ रोजी घडली.सदर घटना दारूच्या वादावरून झाले.परंतु पोलीसांनी संबंधित कोणत्याही आरोपीला अटक न केल्याचे समोर आले आहे.
रहीमापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी फिर्यादी नितीन वामन खंडारे वय ३२ वर्षे यांच्यावर आरोपी महिलेसह तिच्या कुटुंबातील तीन व्यक्तींनी मारहाण केली.फिर्यादीच्या जबानी तक्रारीवरून रहिमापुर पोलीसांनी महिला ज्योती अवधूत खंडारे या आरोपी विरुद्ध कलम ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर जखमी नितीन खंडारे याला सातेगाव येथील रुग्णालयात पोलीसांनी उपचार करण्यासाठी भरती करण्यात आले असून महिलेसह कुटुंबातील तीन व्यक्तींनी मला मारहाण केल्याचे सांगितले.
सातेगांव रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर नितीन खंडारे याला ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर आले होते.अशी माहिती नितीन खंडारे यांच्या कुटुंबीयांनी दिली.याबाबत पोलीसांनी सदर गुन्ह्यात कोणत्याही आरोपीला अटक केली नसल्याची माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास ठाणेदार निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत तर नितीन वामनराव खंडारे याला जबर मारहाण केली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे….