
कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.
वसंत खडसे
उपसंपादक वाशिम
वाशिम : जिल्ह्यात ख्यातीप्राप्त असलेले कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२३_२४ या वर्षाची सुरुवात शिक्षणाच्या आराध्य दैवत क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब तसेच युवकांचे प्रेरणास्थान युगाचार्य स्वामी विवेकानंद व संस्थेचे संस्थापक स्मृतीशेष कर्मयोगी प्रल्हादरावजी काळबांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली आहे.
असंख्य अडचणीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ व युगाचार्य स्वामी विवेकानंद यांचे राष्ट्रप्रेमाविषयीचे अनमोल विचार अशा महान व्यक्तींच्या जीवन चरित्रातील प्रसंग सुजाण विद्यार्थ्यांमध्ये आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्य शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या स्तुत्यहेतूने सदर उपक्रम राबविला असल्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब उपाख्य नारायणराव काळबांडे यांनी सांगितले.
नारायणराव काळबांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गोटे, संस्थेचे सचिव रामभाऊ काळबांडे हे होते तर वाघोली बुद्रुक येथील अशोकराव खंदारे, वाशिमचे निलेश देशमुख, कोकलगावचे संतोष राऊत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पहिल्याच दिवशी शाळेत उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक नारायणराव काळबांडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातील अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एमजी इंगळे, कु. शीलाताई कांबे, संतोष सरोदे, एम. एम. इंगळे, वैजनाथ हजारे, विजय काळबांडे, दत्तात्रय खाजबागे, प्रा. सदाशिव गलांडे, प्रा. दशरथ गिरी, प्रा. संतोष राठोड, प्रा. अरविंद मोरे, प्रा. नवनाथ कदम, प्रा. अनिल काळबांडे, स्वाती गोटे, प्रा. कैलास चव्हाण आदी सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक देवानंद मगर यांनी केले…