
विद्यापिठ प्रशासनाची विद्यार्थ्यांकडे हेतूपुरस्पर डोळेझाक…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने काही दिवसांपूर्वी बी.ए., बि.एस.सी. बि.कॉम.च्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन लागू केले.त्याप्रमाणे फार्मसी इंजिनिअरींग व लॉ च्या विद्यार्थ्यांनासुध्दा कॅरीऑन लागू करावे या मागणीसाठी युवा सेना विद्यार्थ्यांना घेवून विद्यापिठात धडकली.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील फार्मसी,इंजिनिरींग व लॉ चे शेकडो विद्यार्थी युवा सेनेच्या नेतृत्वात विद्यापिठात धडकले.दोन बी.ए.बिएस.सी., बि.सी.ए. बि.कॉम.च्या विद्यार्थ्यांना सीबीएस चे कारण पुढे करून कॅरीऑन लागू केले. परंतु ही सुविधा फार्मसी, इंजिनिअरींग, लॉ च्या विद्यार्थ्यांना मिळाले नाही.कॅरीऑन लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती.या सुविधेपासून फार्मसी, इंजिनिअरींग व लॉ चे विद्यार्थी वंचित आहेत.
विद्यापिठ प्रशासन या विद्यार्थ्यांकडे हेतूपुरस्पर डोळेझाक करून एकप्रकारे अन्याय करीत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून फार्मसी,इंजिनिअरींग,लॉ च्या विद्यार्थ्यांनासुध्दा कॅरीऑन लागू करण्याची मागणी युवा सेनेचे राहूल माटोडे, सागर देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थ्यांनी केली.
यावेळी चंद्रकांत राठोड,अविनाश मालधुरे,अभिषेक माहोरे,विजय सुर्यवंशी,शुभम् इंगळे,अभय राठोड,रोहन तायडे,वेंशू मेटे,रोहन राठोड,अयान अहेमद,दर्शन आंबे,गौरव पावडे,अजॉय मगन,मोहीत आवारे,चेतन जोध,अथर्व पागृत,प्रथमेश भोयर,आदीत्य इंगोले,संकेत कडू यांच्यासह अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.