
दै चालु वार्ता वाशीम
प्रतिनिधी राजेश भगत
वाशिम:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)भोजराजजी चव्हाण, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष, राजूभाऊ अवताडे, प्रदेश सरचिटणीस, मनोजभाऊ कानकीरड ,
कारंजा तालुका अध्यक्ष, आतिष कडेल यांनी कामरगाव, ब्राह्मणवाडा, हिवरा, नारेगाव, मोहगव्हान. या गावांना भेटी देऊन घोंगडी बैठका घेतल्या. बैठकीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार मा. श्री. संजयभाऊ देशमुख यांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल नागरिकांना धन्यवाद देऊन आभार मानले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय मा. श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचे कल्याणकारी सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे गावकऱ्यांना आवाहन करण्यात आले. महाविकास आघाडीचे. सरकार स्थापन झाल्यावर राज्यात शेतकरी, शेतमजूर, महिला सक्षमीकरण , बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे इत्यादी समस्याचे निराकरण होऊन मतदार संघात विकासात्मक कामे निश्चितच करण्यात येतील असे पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले.