
पुणे: भारतीय विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये विद्युत अभियांत्रिकीचया विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील उपकरणांची सखोल माहिती आणि प्रायोगिक अनुभव मिळावा या उद्देशाने “त्रैकल्य” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ज्यामुळे त्यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक वृद्धिंगत झाले.
कार्यशाळेचे उद्घाटन मा. श्री. अमरनाथ चक्रदेव यांच्या हस्ते झाले, या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना उपकरणांच्या योग्य वापराचे महत्व सांगत, तांत्रिक शिक्षणाच्या व्यावहारिक बाजूवर भर दिला. “विद्युत अभियांत्रिकी विभागातील हा उपक्रम भविष्यातही तांत्रिक शिक्षणात नवे मापदंड निर्माण करण्यासाठी एक प्रेरणा ठरेल”, अशी आशा प्राचार्य श्री. राजेंद्र उत्तुरकर यांनी व्यक्त केली.
विभाग प्रमुख प्रा. अश्विनी गोखले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यशाळेस प्राचार्य श्री. राजेंद्र उत्तुरकर यांनी विशेष प्रोत्साहन दिले.या कार्यशाळेचे यशस्वी संयोजन प्रा. अनिता मुथा यांनी केले, प्रा. जागृती ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. प्रा. भारती फिरके यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. या कार्यशाळेने विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण तांत्रिक कौशल्ये प्राप्त करून दिली, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.