
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:शहरात चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२९ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान दिनांक ५ एप्रिल २०२५ (शनिवार) रोजी, सायंकाळी ६:३० वाजता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गंगाखेड येथे होणार आहे.
या कार्यक्रमात मिलिंद महाविद्यालय, मुळवा (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील डॉ.प्रा.अनिल काळबांडे हे चक्रवर्ती सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील वैश्विकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, तहसीलदार उषा किरण शिंगारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत मुंडे यांच्यासह या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यपाल साळवे (नगरसेवक नगरपरिषद, गंगाखेड)उपस्थित राहणार आहेत.
गंगाखेड शहरातील सर्व विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, तरुण आणि नागरिकांनी या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चक्रवर्ती राजा अशोक सम्राट सार्वजनिक जयंती उत्सव समिती, गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.