
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ,चिंचोली येथील तुकोबांच्या पालखी मार्गावरील श्री शनि मंदिरा मध्ये श्री शनि अमावस्या उत्सव शनिवार ( ता.२९ ).रोजी श्री शनैश्वर देवस्थान ट्रष्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्री शनि अमावस्या उत्सवा निमित्त पहाटे ३ ते ६ श्री शनि महाराजांचे अभ्यंगस्नान नित्य महापूजा व आरती. सकाळी ७ ते ९ श्री शनिमहाराजांचा लघुरुद्र महाभिषेक ,सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा ,सकाळी १०:३० ते १:३० साडेसाती ,गृहदशा ,पीडा निवारणासाठी २३००० हजार शनिमहाराजांचा महायज्ञ ( होमहवन ).दुपारी २ ते ७ भजन सेवा ,दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत अखंड महाअन्नदान ( भंडारा ).
सायंकाळी ७ वा. श्री शनैश्वर विशेष पूजा व छपन्नभोग प्रसाद सेवा . सायंकाळी ७:३० श्री शनिदेवाचा महाआरती सोहळा.आशा धार्मिक कार्यक्रमांनी हा शनि अमावस्या उत्सव साजरा करण्यात आला.या निमित्त अगदी पहाटे पासून शनिदेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी शनि भाविक भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.दिवसभर भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून शनिदेवाचे दर्शन घेतले.सर्व धार्मिक कार्यक्रमांन मध्ये सहभागी होऊन या उत्साहाचा आनंद लुटला.श्री शनैश्वर देवस्थान ट्रष्टचे अध्यक्ष दत्ता जाधव ,सचिव रमेश जाधव , दत्तात्रय लांडगे खजिनदार , तसेच प्रसन्न जाधव ,अरुण जगताप , रणधीर भूषण ,संतोष जाधव ,आणि कार्यकर्त्यांनी या उत्सवाचे आयोजन व नियोजन केले होते.