
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये आधारभूत खरेदी योजनेचा मोठा लाभ पालघर व ठाणे जिल्ह्यातील १५,१३३ शेतकऱ्यांना फायदा
➡ महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत आधारभूत किमतीवर खरेदी योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.
➡ ऑनलाईन व पारदर्शक खरेदी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध झाली आहे.
➡ www.mahatdc.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना नोंदणी व खरेदी प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे.
जिल्हानिहाय खरेदीची स्थिती:
✔ पालघर जिल्हा:
▪ १०,४६० शेतकरी लाभार्थी
▪ २ लाख ७१ हजार क्विंटल धान्य खरेदी
▪ ६२ कोटी ४१ लाख १२ हजार ५९० रुपये वितरीत
✔ ठाणे जिल्हा:
▪ ५,५३३ शेतकरी लाभार्थी
▪ १ लाख २५ हजार क्विंटल धान्य खरेदी
▪ २८ कोटी ८२ लाख १० हजार २४० रुपये वितरीत
➡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
▪ ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यांनी त्वरित दुरुस्ती करावी.
▪ धान्य खरेदीची रक्कम वेळेवर मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
➡ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळ, नाशिक – लीना बनसोड