
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :- तालुक्यातील मौजे हाळदा येथे रामनवमी निमित्त हिंदुराष्ट्र मित्र मंडळ हाळदा यांच्या वतीने दिनांक ७ एप्रिल २०२५ रोज सोमवारी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामपंचायत पाटोदाचे मा. सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांचे महादेव मंदिर परिसर हाळदा ता. भोकर येथे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जनजागृती साठी हिंदू राष्ट्र युवा मित्र मंडळ हाळदा ता. भोकर जि. नांदेड यांनी रामनवमीच्या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यानकार मा. भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला आहे. आदर्श ग्राम राज्य निर्मितीसाठी नागरिकांचे कर्तव्य, सरपंचाचे कर्तव्य व लोकप्रतिनिधीचे कर्तव्य यावर विनोदातून चौफेर भाष्य करुन सर्वांना जागे करणारे महाराष्ट्रातले प्रसिद्ध व्याख्यानकार मा. भास्करराव पेरे पाटील हळदा येथे येत आहेत. तेव्हा परिसरातील सर्व गावकऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या व्याख्यानाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन हिंदुराष्ट्र युवा मित्र मंडळ हाळदा ता. भोकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.