दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना –दिनांक 06/04/2025 रोजी श्रीराम नवमी सण साजरा होणार असुन, सददर सण उत्सव काळात जालना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी मा.श्री. अजय कुमार बंसल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक जालना यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अलीकडचे काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे तसेच मागच्या काळात श्रीराम नवमी उत्सव काळात गुन्हे करणारे आरोपीतांवर परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहे.
मा. पोलीस अधीक्षक साहेब जालना यांचे सुचना प्रमाणे जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगारावर कलम 126 व 129 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे एकुण 91 गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या इसमां विरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांचे कडुन चांगले वर्तणुकीचे अंतरीम बंधपत्र घेण्यात आले आहे. तसेच कलम 163 (3) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे एकुण 87 आरोपीना श्रीराम नवमी काळात राहत असलेल्या पोलीस ठाणे हहद्यीत राहण्यास प्रतिबंधीत आदेश देण्यात आले आहे. तसेच कलम 168 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे एकुण 173 इसमांना सार्वजनिक शांतता राखणे बाबत तसेच कोणताही दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा करु नये या करीता प्रतिबंधक करण्यात आले आहे.
सदर ची कारवाई ही मा.श्री. अजय कुमार बंसल (भापोसे) पोलीस अधीक्षक जालना, मा.श्री. आयुष नोपाणी (भापोसे) अपर पोलीस अधीक्षक जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी केली आहे.