
गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही; नवनीत राणा कडाडल्या !
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा देत हल्लेखोर दहशतवाद्यांना कल्पेनेच्यापलिकडची शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलं.
तर, दुसरीकडे राज्यातील नेतेही पाकिस्तानविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मात्र, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्याने हिंदूंना टार्गेट केल्याचं सांगत काही अंशी धार्मिक वादही उफाळून समोर आलाय. मात्र, हिदू-मुस्लीम ऐक्याचीही अनेक उदाहरणे या हल्ल्यानंतर पाहायला मिळाली. त्यातच, भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्वाचा एल्गार केला आहे. त्यांच्या लहान मुलाचे उदाहरण देत आपण गोळ्या खाणार पण कुराण वाचणार नाही, असे नवनीत राणांनी म्हटले.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कलम (कुराण) वाचायला सांगितले. आमच्या बहिणींना वाचता आले नाही, तेव्हा दहशतवाद्यांनी सगळ्या हिंदूंना आणि मुस्लिमांना एकाबाजूला केलं. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या पण कलम (कुराण) वाचायला ते तयार झाले नाहीत, असे म्हणत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पहलगाममधील घटनेची माहिती दिली. तसेच, माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारलं की कलम (कुराण) वाचणार का? तर तो म्हणतो की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आपण कट्टर हिंदुत्त्ववादी असल्याचे जाहीर केले.
भुट्टोला भुट्ट्यासारखं भाजतील
पाकिस्तानचा बुट्टो सांगत आहे की, सिंधु नदीचं पाणी थांबवलं तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. कारण, भारतात एक वाघ राहतात, ज्याचं नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहे. आता पाणी काय तुमचं दाना पण बंद करू, असे नवनीत राणा यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलचा जेवढा खर्च आहे, तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे, असेही नवनीता राणा यांनी म्हटलं.
दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांनी आपला जीव गमावला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तातडीने सीसीएसची बैठक घेऊन 5 महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानला धक्का दिलाय.