
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
__________________
मुंबई, 15जुलै –
सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) च्या अध्यक्ष डॉ. प्रवीण वाजपेई यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबीर आणि कॅन्सर जनजागृती मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली.
मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूर मंडळांमध्ये आयोजीत या उपक्रमात एकूण 519 युनिट रक्त संकलन करण्यात आले.
🔴 विविध मंडळांतील उपक्रम:
मुंबई मंडळ: अध्यक्ष विवेक सिसोदिया व सचिव संजीव कुमार दुबे यांच्या नेतृत्वाखाली 160 युनिट रक्तदान.
पुणे व मिरज मंडळ: अध्यक्ष एस. पी. सिंह व सचिव सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनात 203 युनिट रक्त जमा.
भुसावळ मंडळ: अध्यक्ष मोहम्मद इरफान, सचिव एस. बी. पाटील, समन्वयक ए. के. तिवारी यांच्या उपस्थितीत 156 युनिट रक्त व वृक्षारोपण कार्यक्रम.
सामाजिक योगदान:
या उपक्रमासाठी महावीर इंटरनॅशनल ट्रस्टचा विशेष सहभाग लाभला. अध्यक्ष घनश्याम मोदी व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. वाजपेई यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
विशेष उपस्थिती आणि गौरव:
राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) चे संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी शिविराला शुभेच्छा दिल्या.
डॉ. वाजपेई यांनी सांगितले, “रक्तदान हे जीवनदान आहे, आणि सीआरएमएस संघटना कायम गरजूंसाठी तत्पर राहील.”
जे.जे. महानगर रक्तपेढीच्या श्रीमती नीता डांगे यांच्यासह संपूर्ण मेडिकल स्टाफने सहकार्य केले.
मुख्यालयात उत्सवमय वातावरण:
दादर मुख्यालयातही सीआरसीएलएस पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांचा पुष्पगुच्छ व अभिनंदनाने सन्मान केला. कोषाध्यक्ष आर. जे. सिंह, राजश्री परब, लक्ष्मी पनीकर आदींची उपस्थिती होती.
आयोजक मंडळींचा विशेष सहभाग:
कार्यकारी अध्यक्ष वी. के. सावंत, महासचिव अनिल दुबे, महिला अध्यक्ष शिल्पा पालव, युवा अध्यक्ष गणेश मीना, मीडिया सल्लागार आर. बी. चतुर्वेदी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
“डॉ. वाजपेई यांच्या नेतृत्वाखाली सीआरएमएस संघटना ही केवळ कर्मचारी हक्कांसाठीच नाही, तर समाजहितासाठीही एक आदर्श ठरत आहे.”